Saturday

आजची मुख्य बातमी.

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या गुरुवारी (ता. 8) नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. गुरुवारपासून ते राज्यभर विविध शासकीय योजनांच्या आढावा बैठकी घेतील. नाशिकपासून दौऱ्याची सुरवात होणार आहे.

प्राधान्यक्रमाच्या विषयाच्या आढाव्यासाठी नाशिकपासून सुरवात होणाऱ्या या दौऱ्यात पहिल्या दिवशी नाशिक व औरंगाबाद विभागाच्या कामाचा आढावा घेतील. त्यानंतर 11 सप्टेंबरला नागपूर व पुणे, 16 सप्टेंबरला अमरावती, तर 18 ला कोकण विभाग असा त्यांचा दौरा आहे. या बैठकीत जलयुक्त शिवार योजना, शेततळे, नागरी-ग्रामीण स्वच्छता अभियान, मुद्रा, कृषी कर्जाचे पुनर्गठन या विषयांचा आढावा घेतला जाईल. 


No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट देऊन तुम्ही केलेले मार्गदर्शन किंवा दिलेल्या शुभेच्या हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.