आशा भोसले - (८ सप्टेंबर, इ.स. १९३३ - हयात) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- १७२७ : इंग्लंडच्या कॅम्ब्रिजशायरमध्ये कचकड्याच्या खेळ चालू असताना लागलेल्या आगीत अनेक मुलांसह ७८ ठार.
- १८३१ : विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
- १९०० : अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
- १९१४ : पहिले महायुद्ध-लढाई चालू असताना हुकुमाविरुद्ध रणांगणावरुन पळून गेलेल्या थॉमस हायगेटला युनायटेड किंग्डमने मृत्युदंड दिला.
- १९२३ : अमेरिकेच्या नऊ विनाशिका कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर चढल्या. यांपैकी सात नौका भंगारात काढाव्या लागल्या.
- १९२६ : जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला.
- १९३४ : एस.एस. मॉरॉया प्रवासी जहाजाला न्यू जर्सीच्या किनाऱ्याजवळ आग लागली. १३५ ठार.
- १९४३ : दुसरे महायुद्ध-ड्वाईट डी. आयझेहॉवरने इटलीशी झालेली संधी जाहीर केली.
- १९४४ : दुसरे महायुद्ध-लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
- १९४५ : शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
- १९६२ : अल्जीरियाने नवीन संविधान अंगिकारले.
- १९६६ : स्टार ट्रेक मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
- १९७० : पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या तीन अमेरिकन विमानांचा नाश.
- १९७४ : वॉटरगेट कुंभांड - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेरी फोर्डने रिचर्ड निक्सनला त्याने केलेल्या गुन्ह्यांची माफी दिली.
- १९९१ : मॅसिडोनियाला स्वातंत्र्य.
- १९९४ : युएसएरचे बोईंग ७३७ प्रकारचे विमान पेनसिल्व्हेनियातील अलिकिप्पा शहराजवळ कोसळले.
जन्म, वाढदिवस
- ११५७ : रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १२०७ : सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १६३३ : फर्डिनांड चौथा, हंगेरीचा राजा.
- १८३० : फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.
- १८५२ : ग्वांग्मु, कोरियाचा राजा.
- १८५७ : जॉर्ज मायकेलिस, जर्मनीचा चान्सेलर.
- १९०१ : हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १९१८ : डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- १९२६ : भपेन हजारिका, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
- १९३३ : आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक.
- १९४४ : टेरी जेनर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- ७०१ : पोप सर्जियस पहिला.
- ७८० : लिओ चौथा, बायझेन्टाईन सम्राट.
- १९३३ : फैसल पहिला, इराकचा राजा.
- १९६० : फिरोज गांधी, राजनितीज्ञ.
- १९६५ : हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९८० : विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९८१ : हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९८१ : निसर्गदत्त महाराज उर्फ मारोती शिवरामपंत कांबळी, नवनाथ सांप्रदायाचे पुरस्कर्ते.
- १९८२ : शेख अब्दुल्ला, काश्मीरचे मुख्यमंत्री.
- १९९७ : डॉ. श्रीमती कमला सोहोनी, भारतातील पहिल्या महिला जैवरसायन शास्त्रज्ञ व आहारतज्ञ.
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट देऊन तुम्ही केलेले मार्गदर्शन किंवा दिलेल्या शुभेच्या हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.