शिक्षण – एक चांगली सवय
एस.एस.एच्या मोहीमांचा चांगला मोबदला
हूशाराचा समुह
सरकारच्या बोवेनपल्लीच्या प्राथमिक शाळेच्या विर्द्यांथ्यांनी एस.एस.ए तर्फे आयोजीत केलेल्या मुलांच्या भाषा सुधार कार्यक्रमात भाग घेतला.हैद्राबाद: सरकारी शाळांमध्ये घाणरडे गणवेश व फाटक्या चप्पलांमधील मुले हे चित्र असते. पण, त्यांचा दृष्टिकोन कोणत्याही मोठ्या शाळांच्या मुलांइतकाच बोर्डात व पेपरात चमकण्याचा असतो व त्यांचा कल चांगल्या प्रतीच्या शालेय शिक्षणाकडे असतो.
आश्चर्य कारक बाब म्हणजे पडक्या सरकारी शाळांत देखील आपल्या कला दाखवण्यासाठी मुलांनी प्रत्येक वर्गात एक लायब्ररी तयार केली आहे, व शाळेच्या घडामोडींचे वृत्तपत्र सुरु केले आहे. सर्व शिक्षण अभियान(एस.एस.ए.) अशा व्यावसाईक दृष्ट्या मागासलेल्या मुलांच्या चांगल्या वाचन व लिखाणासाठी कार्यरत आहे. मागील वर्षापर्यंत, कविता नावाची ७वी इयत्तेत शिकणारी एक मुलगी, सरकारी माध्यमिक शाळेत बावेनपल्ली येथे सर्व सामान्य मुलांप्रमाणे शिकत होती जेथे काही खास सोई नव्हत्या. पण आज ती स्वतःच्या वर्गासाठी बातमीपत्र तयार करते व शाळेच्या वाचनालयाच्या समितीचे कामही स्वतः पाहते. वाचनालय समितीची मुले कोणती पुस्तके घरी नेतात व वाचतात याची नोंद ठेवते. ही पुस्तके काही वाचक मंडळींनी स्वखुशीने दिलेली वा शाळेच्या समितीने त्या भागातुन गोळा केलेली असतात. “ हा सर्वात छान असा ऊच्चप्रतीचा फरक पडलेला आहे ज्यामुळे आमच्यात फार चांगले बदल घडत आहेत.,” असे बी. विणा, म्हणते.
एन. ऊपेंद्र रेडडी, राज्य शैक्षणिक देखरेख अधिकारी, एस.एस.ए, हे मान्य करुन म्हणतात की, “ह्या मागचा हेतू मुलांमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात पुढाकाराचे गुण वाढले पाहिजेत जसे इतर शाळकरी मुलांमध्ये दिसतात. आणि ह्या कार्यात ब-याच मुलांनी भाग घेऊन ऊत्स्फुर्त प्रतिसाद दिला.”
बातमी पत्र फलक हा उपक्रम मुलांमध्ये पेपर व वेगवेगळी मासिके वाचून ते फलकावर त्यांच्या स्वतःच्या नावाने लावल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो, हे रंगारेड्डी नगर प्राथमिक शाळा, कुतूबुल्लापूर मंडळ येथे पहायला मिळते, जेथे मजूरांच्या गरिब मुलांमध्ये हा फरक पडलेला आहे. ५ वीत शिकणारा बाळू म्हणतो कि “यामुळे आपल्या स्वतः मधील गुण दाखवण्यास मदत होते,” . मुलांना प्रत्येक दिवशी एक पान लिहायला लावून मुलांचे लेखनाचे गुण वाढीला लागतात. प्रत्येक शाळेत पत्रपेटी ठेवण्यात आलेली आहे ज्यात मुले आपली मते, समस्या वा शाळे बद्दलचे आपले मत लिहून टाकतात. “ह्यामुळे फार मोठा चांगला फरक पहायला मिळाला आहे,” असे वी.मधुसुदन, फिरते सहकारी अधिकारी, एस.एस.ए म्हणतात.
मुळ : द हिंदु, रोजचे वृत्तपत्र ता. ९ आँगस्ट २००७
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट देऊन तुम्ही केलेले मार्गदर्शन किंवा दिलेल्या शुभेच्या हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.