*
समाजकल्याण ♿*
या ब्लॉग चे app डाऊनलोड करण्यासाठी
http://app.appsgeyser.com/Devla%20Brc
ला क्लिक करा.
समाजकल्याण
सामाजिक आदान-प्रदान
सामाजिक आदान-प्रदान
(सोशल कम्युनिकेशन). सामाजिक आदान-प्रदान ही समाजशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. समाज अनेक समूहांचा आणि अनेक प्रकारच्या व्यक्तींचा असतो. या नानाविध व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण चालू असते. व्यक्ती वेगळ्या वयाच्या, विविध नातेसंबंध असलेल्या व विविध धर्म-पंथांच्या आणि विविध रिवाज पाळणाऱ्या असतात. व्यक्ती वेगवेगळे व्यवसाय करतात म्हणूनच समाजव्यवस्था चालू राहते. असे व्यक्तिसमूह एका भौगोलिक प्रदेशात राहतात म्हणूनच त्या जागेबद्दलची आत्मीयता ‘आपला गाव, राज्य, देश आणि आपले एकत्र राहणारे सर्व लोक’ अशी भावना समूहांमध्ये असते; आणि अशा समुदायांमध्ये सतत आदान-प्रदान चालू असते. स्वतःला विसरुन समूहातील व्यक्तींचे आदानऐ-प्रदान सामाजिक स्वरुपाचे असते. प्रसिद्घ जर्मन समाजशास्त्रज्ञ ⇨माक्स वेबर (१८६४–१९२०) यांनी चार प्रकारचे आदान-प्रदान असल्याचे सांगितले आहे : पारंपरिक (मंदिरबांधणीत सहभाग, पूजा-अर्चा, उपवास इ. रुढी पाळणे),मानसिक (प्रेम करणे, वाईट वाटणे, भिणे, सहकार), मूल्यप्रमाणित वर्तन (कायदे पाळणे, सामूहिक लढ्या त भाग घेणे इ.) व वैचारिक आणि व्यावहारिक वर्तन.प्रसिद्घ अमेरिकन समाजशास्त्रज्ञ ⇨टॅलकॉट पार्सन्झ (१९०२– ७९) यांच्या मते समुदायातील व्यक्ती क्रि यांची निवड समुदायातील नियमांनुसार करते. समाजाच्या सुरुवातीपासून व्यक्ती इतरांशी प्रेमाने, सलोख्याने, सहकार्याने वागते. आज व्यक्ती एकत्र उत्पादनाचे काम करतात, सरकारने सुरु केलेल्या कामावर सर्वांना बरोबर घेऊन कामाचा भार उचलतात. असे असूनही व्यक्ती नेहमीच असे वागत नाहीत......क्रमश.
वरील संपूर्ण माहितीसाठी व यासारखे शैक्षणिक व ज्ञानवर्धक माहितीसाठी मिळविण्यासाठी
मल्लिकार्जुन देवरे (नांदेड)
विशेष शिक्षक
BRC देवळा.
8308296293
धन्यवाद
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट देऊन तुम्ही केलेले मार्गदर्शन किंवा दिलेल्या शुभेच्या हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.