१. हॅकिंग - हॅकिंग म्हणजे नियमांचे उल्लंघन करणे
अथवा बेकायदेशीर पध्दतीचा अवलंब करणे. सायबर गुन्ह्यामध्ये संगणाक, संगणक नेटवर्क अथवा वेबसाईटची
सुरक्षितता भेदणे व त्यामधील माहिती बदलणे, चोरणे किंवा
संगणाक प्रणाली खराब करुन त्यामध्ये बिघाड करणे, यास हॅकिंग
म्हणतात. याच पध्दतीने “क्रकिंग” हाही
सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे. यामध्ये सुरक्षिततेचा पासवर्ड क्रॅक केला जातो.
म्हणजे पासवर्ड शिवाय संगणाक व संगणक प्रणालीचा वापर करतात ज्या संगणकावरील गोपनीय
माहितीची चोरी करावयाची आहे त्यावर रेडीमेड प्रोग्रॅम वापरुन हॅकर हल्ला चढवितात.
याच्यामागचा हेतू स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, क्रेडीट
कार्डवरील माहिती मिळवून त्या क्रेडीट कार्डच्या अकाऊंटचे पैसे काढून हेणे हा
असतो. मोठ्या व्यवसायिकांच्या चोरलेल्या गुप्त व महत्त्वाच्या माहितीचा वापर
त्यांना धमकाण्यासाठी व पैसे मिळविण्यासाठी करतात
२. सायबर स्टॉकिंग – यामध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला धमक्या देऊन
व मेल पाठवून जेरेस आणतात. फोन करुनही त्रास देतात.
३. डेनायल ऑफ सर्व्हिस ऍटक – (सुविधा नादुरुस्त करणे) यामध्ये
नेटवर्कची सुविधा बंद करण्यासाठी नेटवर्कची बॅन्डविडथ फ्लड करतात. असंख्य व फार
मोठ्या मेल पाठवून (स्मॅम मेल) मेल बॉक्स भरुन टाकतात. यामुळे नेटवर्कमधील ट्रॅफिक
जॅम होते व कम्युनिकेशन थांबते.
४. व्हायरस डेसीमिनेशन (व्हायरसमुळे विध्वंस)– व्हायरस म्हणाजे संगणाकबाह्य
सूचना संगणाकात प्रवेश करुन बिघाड करतात, माहितीची नासधूस
करतात. अशा संगणक प्रोग्रॅमला व्हायरस म्हणतात. अशा उपयोग संगणक प्रणाली दूषित
करुन हेतूपूर्ण नुकसान घडवितात. असे व्हायरस प्रोग्रॅम, संगणकतज्ज्ञ
कुहेतुनेच तयार करतात.
५. सॉफ्ट्वेअर पायरसी (सॉफ्ट्वेअरची चाचेगिरी) – संगणक वापरासाठी संगणकासाठी तयार
केलेले कायदेशीर सॉफ्ट्वेअर म्हणजेच लायसेन्स सॉफ्ट्वेअर वापरावयाचे असते. परंतु
काहीजण अशी लायसेन्स सॉफ्टवेअर वापरत नाहीत. बेकायदेशीरपणे सॉफ्ट्वेअरची कॉपी करुन
वापरण्यास सॉफ्ट्वेअरची चाचेगिरी म्हणतात. कॉपी केलेल्या सॉफ्ट्वेअरला पायरेटेड
सॉफ्ट्वेअर म्हणतात. पायरेटेड सॉफ्टवेअर तयार करणे अथवा वापरणे गुन्हा आहे तसेच
पायरेटेड सॉफ्टवेअरने डाटा खराब होण्याची भिती असते.
६. आय.आर.सी.क्राईम (IRC Crime Internet Realy Chat) -
इंटरनेटवर सध्या चेटरुम उपलब्ध आहेत. यामध्ये चॅट
करणारी व्यक्ती खोटी माहिती सांगून दुस-याला फसवू शकते. अशा चॅटरुममध्ये खोटी
माहिती देऊन इतरांना फसविण्याचे प्रकार अनेक बाढलेले आहेत. अशा चॅटरुममध्ये
गुन्हेगारीला आय.आर.सी.क्राईम असे म्हणतात.
७. क्रेडीट कार्ड फ्रॉड – यामध्ये क्रेडीट कार्डचा
बेकायदेशीर वापर करुन खरेदी करण्याचे गुन्हे केले जातात.
८. नेट एक्स्ट्रॉरशन (Net Extortion) – कंपनीचा गोपनीय व
महत्त्वाचा डाटा चोरी करुन त्यापासून पैसे मिळविले जातात किंवा कंपनीकडूनच पैसे
मागितले जातात.
९. पिशिंग (Phishing) – यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेल पाठवतात
व लोकांची पर्सनल माहिती मिळवतात. अनावधानाने मेलला उअत्तर देतानाबॅक अकाऊंट नंबर,
पासवर्ड पाठवला जातो. नंतर गैरवापर करतात.
१०. चाईल्ड पोरनोग्राफी – लहान मुलांना फसवून त्यांनाअ
बीभत्स चित्र, वाडमय, चित्रफित
पाठविल्या जातात. यामध्ये लहान मुलांचे मेल ऍड्रेस मिळवितात. चॅटमध्ये खोटी माहिती
सांगून त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यांना मेलद्वारे बीभत्स गोष्टी दाख्वून
समाजामध्ये सगळेपण असेच करतात असे त्या मुलाला सांगून त्याची पूर्ण फसवणूक करतात.
त्याचा विश्वास बसल्यानंतर त्याला घराबाहेर भेटण्यास सांगतात. अशा भेटीमध्ये
मुलांचा आणखी विश्वास संपादन करुन त्याच्याकडून अनैतिक लैंगिक गोष्टी करवून घेतात.
असे अनेक प्रकारचे सायबर गुन्हे अनैतिक लोक करत
असतात व याचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशा गुन्ह्यांपासून समाजाने सावध राहिले
पाहिजे व प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे.
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट देऊन तुम्ही केलेले मार्गदर्शन किंवा दिलेल्या शुभेच्या हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.