Tuesday

*लेख मोठा आहे पण आपल्या माहितीसाठी आवश्यक आहे*
*सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध*


गुन्हेगारी ही पूर्वापार चालत आली आहे. गुन्हे होऊ नयेत म्हणून सुरक्षेचे उपाय योजावे लागतात. सुरक्षा असली व योग्य काळजी घेतली असली तरी गुन्हेगार हे गुन्हे करतातच. काही गुन्हेगार शोधले जातात तर काही सापडत नाहीत. संगणक व इंटरनेटच्या प्रगतीने इलेक्ट्रॉनिक डाटा ट्रान्सफर केला जातो. तसेच ई-बॅकिंग, पेपरलेस ऑफिस सारखी संकल्पना जेथे महत्त्वाची माहिती ही कागदावर न ठेवता ई-डॉक्युमेंटच्या स्वरुपात असते. अशा या व्यवहारामध्ये संगणक, संगणकांचे नेटवर्क, ईलेक्ट्रॉनिक डाटा स्टोरेज, मेसेजिग पध्दत व इतर संबंधित उपकरणे याला सायबर सोसायटी असे म्हणतात. या सायबर सोसायटीमध्ये जे गुन्हे होतात त्यांना सायबर गुन्हे असे म्हणतात. १९६० च्या दशकात अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याला रशियाच्या पोलादी संरक्षक कवचामधून विश्वसंहारक अस्त्रांची गुप्त माहिती मिळणे अवघड होते. तर रशियाचे गुप्तहेर खाते अमेरिकेची गुप्त माहिती लोकशाही वातावरणात सहज मिळवतील अशी भिती अमेरिकेला होती. म्हणूनच ही गुप्त माहिती अमेरिकेने डिजिटाईजड केली म्हणजे संगणकावर ठेवली., यातूनच आंतरजाल अस्तित्त्वात येऊन आता ५०वर्षानंतर बहुतांशी सर्व बॅका यांचे व्यवहार हे संगणकामधून होत आहेत. गुप्त माहिती संदेश हे संगणकाद्वारेच साठविले जात आहेत. याच्या प्रसाराबरोबरच गुन्हेगारीची वाढ होत आहे. सुरक्षा व प्रतिबंधासाठी योजना आखाव्या लागतात. त्यामध्ये समाजाला व्यवसायिकांना व सरकारने योग्य उपाययोजना करावी लागते. यासाठी सरकारने IT ऍक्ट संमत केला.

सायबर गुन्हा –

सायबर गुन्हा ह्या पारंपारिक गुन्ह्याप्रमाणेच असतो फक्त तो सायबर स्पेस मध्ये इलेक्ट्रॉनिक व संगणकीय वातावरणात केलेला असतो. म्हणून त्यास सायबर गुन्हा म्हणतात.

संगणकीय क्षेत्रांमध्ये केलेल्या अपराधांना किंवा गुन्ह्यांना सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम असे म्हणतात.

सायबर गुन्हेगार – सायबर गुन्हे करणा-यांना सायबर गुन्हेगार म्हणतात. तंत्रज्ञानाची प्रगती जेव्हा होत असते, त्या वेळेस त्याचे फायदे अनेक असतात. परंतु अशा तंत्रज्ञानाचा गैरफायदा घ्र्णाअरे, अनैतिक मार्गाचा वापर करणारे किंवा समाजकंटक यांमुळे अनेक धोकेही संभवतात. गुन्हेगारी वृत्तीची माणसे अशा तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक गुन्हे करतात.

सायबर गुन्ह्यांचे प्रकार –

१. हॅकिंग - हॅकिंग म्हणजे नियमांचे उल्लंघन करणे अथवा बेकायदेशीर पध्दतीचा अवलंब करणे. सायबर गुन्ह्यामध्ये संगणाक, संगणक नेटवर्क अथवा वेबसाईटची सुरक्षितता भेदणे व त्यामधील माहिती बदलणे, चोरणे किंवा संगणाक प्रणाली खराब करुन त्यामध्ये बिघाड करणे, यास हॅकिंग म्हणतात. याच पध्दतीने “क्रकिंग” हाही सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे. यामध्ये सुरक्षिततेचा पासवर्ड क्रॅक केला जातो. म्हणजे पासवर्ड शिवाय संगणाक व संगणक प्रणालीचा वापर करतात ज्या संगणकावरील गोपनीय माहितीची चोरी करावयाची आहे त्यावर रेडीमेड प्रोग्रॅम वापरुन हॅकर हल्ला चढवितात. याच्यामागचा हेतू स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, क्रेडीट कार्डवरील माहिती मिळवून त्या क्रेडीट कार्डच्या अकाऊंटचे पैसे काढून हेणे हा असतो. मोठ्या व्यवसायिकांच्या चोरलेल्या गुप्त व महत्त्वाच्या माहितीचा वापर त्यांना धमकाण्यासाठी व पैसे मिळविण्यासाठी करतात.

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट देऊन तुम्ही केलेले मार्गदर्शन किंवा दिलेल्या शुभेच्या हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.