Thursday

अपंग : कल्याण व शिक्षण

(शारीरिक किंवा मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपली दैनंदिन कामे करणे ज्यांना दुष्कर किंवा अशक्यप्राय आहे, अशा व्यक्तींना ‘अपंग व्यक्ती’ म्हणतात. मुख्यत: आनुवंशिक वारसा, अपघात किंवा रोग या तीन कारणांनी अपंगता निर्माण होऊ शकते. अपंगांमध्ये, आंधळे, मुके—बहिरे आणि हातापायाने लुळे असलेले किंवा हातपायच नसलेले पांगळे-थोटे आणि मनाने दुर्बल असणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश होतो. ह्रदय, फुप्फुस, डोळे इ. महत्वाच्या अवयवांच्या चिरकारी व्याधींमुळे अकार्यक्षम झालेले स्त्रीपुरुष व शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असणारी मुले यांचाही अपंग व्यक्तींत समावेश करण्यात येतो.
डॉ. हेन्री कीसलर यांच्या मतानुसार दुष्काळ, रोगराई, युद्ध इ. कारणांमुळे अपंगता प्राप्त झालेल्यांची संख्या जगातील एकंदर लोकसंख्येच्या पंचवीस टक्के आहे. दुसऱ्या महायुद्धापासून अपंगांच्या प्रश्नास असाधारण महत्व प्राप्त झाले. हेन्री व्हिकारडो यांनी १९५२ मध्ये अमेरिकेत ‘अंबिलिटीस इंर्पोरेटेस’ नावाची अपंगांच्या पुवर्वसनासाठी एक संस्था काढली. भारतात १९५७ मध्ये श्रीमती फातिमा इस्माईल यांनी मुंबईत एक संस्था स्थापून भारतातील अपंगांच्या पुनर्वसनाच्या समस्येस तोंड देण्याच्या प्रयत्नास चालना दिली.
न्मजात अपंग व जन्मानंतर झालेले अपंग, असे अपंगाचे दोन मूलभूत प्रकार आहेत. अपंगांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. निरनिराळ्या साधनांचा वापर करून पूर्णत: स्वावलंबी होण्यासारखे, केवळ संरक्षित वातावरणात कार्य करू शकणारे आणि अर्थोत्पादनास अयोग्य, असे अपंगांचे तीन वर्ग आहेत.
न्मास किंवा बालपणात आलेली अपंगता व प्रौढपणी प्राप्त झालेली अपंगता यांमध्ये फरक असा, की पहिल्या प्रकारात पुनर्वसनाची आवश्यकता असली तरी निकड नसते; कारण अर्थोत्पादन करू लागण्यास त्यांना अवधी असतो. दुसऱ्या प्रकारात अर्थोत्पादनात एकाएकी खंड पडल्याने पुनर्वसन शक्य तितक्या लवकर होणे आवश्यक असते. हे न झाल्यास परावलंबित्व उद्भवण्याची शक्यता असेत. एकाहून अधिक उणिवा असल्याची ही पुनर्वसना प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होतो. लहान मुलात अपंगतेचे अस्तित्व ओळखणे अवघड असले तरी महत्त्वाचे असते. अपंगता आहे असे निश्चित झाले, की मुलाची शारीरिक, मानसिक व भावनात्मक तपासणी करून अपंगतेची व्याप्ती ठरविली जाते व त्यानुसार कोणते उपचार करावे लागतील याचा अंदाज घेता येतो. मूल ज्या कुटुंबात असेल, त्या कुटुंबातील व्यक्तींची मनोभूमिका व आर्थिक स्थैर्य लक्षात घेणेही आवश्यक असते. मुलाला व त्याच्या कुटुंबीयाना वास्तव दृष्टीने वागणूक देणे महत्त्वाचे असते. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यास जास्तीत जास्त संधी देणे, हे त्याच्या पुनर्वसनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. तरीदेखील अशक्य गोष्टी साध्य होतील या भ्रमात त्याने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी राहणे अनिष्ट असते. पुस्तके, रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट इत्यादींच्या साहाय्याने अपंग मुलांच्या पालकांना शिक्षण देऊन अपंग मुलाचे संगोपन कसे करावे याविषयी योग्य ती माहिती देण्यात येते. सर्वसाधारण शिक्षणपद्धती व खास शिक्षणपद्धती यांचा वापर करून मुलाची अपंगता जास्तीत जास्त दूर करून त्यास स्वालंबन साध्य झाले,  तरच पुर्वसनाचा मूलभूत उद्देश साध्य होतो.
के काळी असे मानले जात हेते, की वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीबरोबर जगातील रोगराई आणि अपंगता नष्ट होईल. परंतु आज तरी अशी स्थिती आहे, की मृत्युमान कमी झाले असले, तरी अपंगता त्या प्रमाणात कमी झालेली नाही. इथेच असमर्थता आणि अपंगता यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवा. असमर्थता ही प्राथमिक स्वरूपाची असते आणि तिच्यामधून अपंगता निर्माण होते. डोळे नसल्यामुळे योणारी असमर्थता फक्त डोळ्यांच्या जगातच अपंगता ठरते. एखादा अंध मुलगा सभोवतालच्या वातावरणात कुतूहलाचा आणि दयेचा विषय होतो. परंतु अंधशाळेमध्ये त्या मुलाविषयी कोणालाच कृत्रिम सहानुभूती अथवा दया नसते. त्यामुळे अंधशाळेमध्ये हा मुलगा मनाने सुरक्षित असतो. अर्थातच त्याचे हे समाधान खोटे आणि कृत्रिम असते. या अंध मुलाला केव्हा ना केंव्हा तरी डोळसांच्या समाजात परत जावयाचे आहे, हीच दृष्टी योग्य आणि शास्त्रीय आहे. सारांश, अपंगता आणि अपंगांचे पुनर्वसन हे प्रश्न सामाजिक आहेत.
पंग मुलाबाबतचा दृष्टिकोन त्याचे जीवन घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे अगत्याचे आहे. परंतु त्याआधी शरीरचना आणि मनोरचना ह्यांचा अपंगतेच्या संदर्भात परस्परांशी काय संबंध आहे हे पाहणे आवश्यक आहे. काही विशिष्ट तऱ्हेच्या शरीररचनेमुळे वागण्यामध्ये काही वेगळेपणा येण्याचा संभव आहे किंवा काय, याचा विचार पूर्वीपासून केला जात आहे. ह्या शास्त्राला ‘सोमॅटोसायकॉलॉजी’ असे म्हणतात. याबाबत स्थूल मानाने काही सूत्रे अशी सांगता येतील : (१) अपंग मुलाच्या शरीररचनेचा मनोरचनेशी प्रत्यक्षत: संबंध नसतो. केवळ अपंग आहे म्हणून मुलाच्या मनात विकृती आहे असे; किंवा शरीराने तो चांगला आहे म्हणून त्याचा मनोविकासही उत्तम झाला आहे असे मानणे चुकीचे होईल. (२) मनुष्य म्हणजे केवळ हाडामांसाचा पुतळा नाही; त्याच्या शरीरात अनेक अंत:स्रावी ग्रंथी कार्य करीत असतात. या ग्रंथींतील स्रावांचा माणसाच्या शरीरातील वाढीप्रमाणे वर्तुणुकीवरही परिणाम होतो. (३) माणसाची वाढ आणि वर्तणूक ही केवळ परस्परांवर अवलंबून नसून सामाजिक घटनांचा दोहोंवरही परिणाम होत असतो.
                                                                               श्री.मल्लिकार्जुन देवरे 

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट देऊन तुम्ही केलेले मार्गदर्शन किंवा दिलेल्या शुभेच्या हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.